अनेक वादानंतरही पद्मावत 'हिट'

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • मनोरंजन

संजय लीला भन्साली यांचा वादग्रस्त ठरलेला 'पद्मावत' हा सिनेमा अखेर अनेक वाद-विवादानंतर अाज रिलिज झाला. करणी सेनेच्या विरोधानंतर चार राज्यांत रिलिज होऊ न शकलेल्या पद्मावतला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंकता होती. मुंबईसह राज्यभरात कडक बंदोबस्तात हा चित्रपट रिलिज करण्यात अाला. मात्र अनेक वादानंतरही पद्मावत हा सिनेमा पहिल्या दिवशी हिट ठरला अाहे.

पहिल्या दिवशी मजबूत कलेक्शन

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, शाहीद कपूर अशी तगडी स्टारकास्ट अाणि एेतिहासिक दृश्यांसाठी उभारण्यात अालेले सेट यामुळे पद्मावतच्या निर्मितीसाठी २०० कोटी रुपये खर्च अाला. मात्र सुरुवातीपासून सुरू असलेल्या विरोधामुळे तसेच अनेक राज्यात हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे चित्रपटनिर्मितीचा खर्च तरी वसूल होणार का, याबाबत सर्वांना शंका होती. पण पहिल्या दिवशी या चित्रपटानं मजबूत गल्ला जमा केला अाहे.

रणवीरचं चाहत्यांना भावनिक अावाहन

या चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणवीर सिंगने 'पद्मावत' च्या संपूर्ण टीमला आणि चाहत्यांना भावनिक अावाहन केलं अाहे. या संदेशामध्ये त्याने त्यांच्या चित्रपटाविषयीच्या भावना आणि 'पद्मावत' च्या संपूर्ण टीमला धन्यवाद दिले आहेत. त्याचप्रमाणे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं निमंत्रणही दिलं अाहे.

समीक्षकांनीही केलं कौतुक

अनेक समीक्षकांनी या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांनीही पहिल्या दिवशी या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांनी दीपिका पदुकोण, रणवीर सिंगच्या अभिनयाचंही कौतुक केलं अाहे.

अालिया भटनंही केली स्तुती

फक्त प्रेक्षकांनीच नव्हे तर बाॅलीवुड अभिनेत्री अालिया भटने दिपीकाचं भरभरून कौतुक केलं आहे. अालियानं रणवीरचंही कौतुक केलं आहे. आलिया म्हणते, रणवीर हा एक शानदार व्यक्ती आहे. तू हे केलं कसं. तुला बघून मी स्तब्ध झाले. पद्मावत एक प्रकारची जादू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या