डॉक्टरांना भेटल्यानंतर अमिताभ बच्चन यांची भावनिक पोस्ट

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. आपल्या आयुष्यातील अनेक घडामोडी ते ट्विटर किंवा फेसबुकद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यावेळी त्यांनी फेसबुकवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. डोळ्याला झालेल्या त्रासानंतर आलेली आईची आठवण त्यांनी सोशल मीडियावर एका भावूक पोस्टद्वारे शेअर केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्रास होणाऱ्या डाव्या डोळ्याचा फोटो फेसबुकवर अपलोड केला आहे. त्यासोबत आपल्या भावना शब्दांमध्ये व्यक्त केल्या आहेत

डावा डोळा फडफडत होता, लहानपणी ऐकलं होतं की हे अशुभ असतं.

त्यामुळे डॉक्टरांना दाखवायला गेलो, तर डोळ्यात एक काळा ठिपका दिसला.

डॉक्टर म्हणाले…काही नाही वयामुळे झालं आहे…लहानपणी आई पदराचा बोळा करुन, फुंक मारुन, डोळ्याला शेक द्यायची तसं करा, सर्वकाही ठिक होईल.

पण आता आई तर नाहीये…वीजेद्वारे रुमाल गरम करुन शेक घेत आहे.

मात्र त्याचा काही उपयोग नाही

आईचा पदर, तर आईचा पदरच असतो…त्याला दुसऱ्या कशाची सर नाही’ अशा आशयाची पोस्ट केली.


हेही वाचा

राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड म्हणजे 'चंद्रमुखी'

वरुण धवन बनला 'Mr. लेले', या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

पुढील बातमी
इतर बातम्या