मुकेश-नीता अंबानी बनले आजी-आजोबा

(File Image)
(File Image)

देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले उद्याेगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी (mukesh ambani) आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी आजी-आजाेबा झाले आहेत. अंबानी कुटुंबाकडून निवेदन प्रसिद्ध करत ही आनंदवार्ता देण्यात आली आहे.

मुकेश-नीता अंबानी यांचे चिरंजीव आकाश आणि त्याची पत्नी श्लोका यांनी गुरूवारी पुत्ररत्नाला जन्म दिला आहे. नवजात बाळ आणि श्लोका या दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचंही सांगण्यात आलं आहे. अंबानी कुटुंबात दाखल झालेल्या नव्या पाहुण्याची चर्चाही लागलीच सर्वदूर पसरली आहे. 

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्येच शालेय शिक्षण झालेले आकाश आणि श्लोका हे दोघंही लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. यानंतर आकाश अंबानी आणि श्लोका यांचा २०१९ मध्ये वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ गार्डनमध्ये मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता. संपूर्ण जगभरात या राजेशाही लग्नाची चर्चा झाली होती. लग्न सोहळ्याला आंतरराष्ट्रीय पाहुणेमंडळींपासून सिनेसृष्टी, क्रीडा, उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. 

श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे. उद्योगासोबतच श्लोकाला सामाजिक कार्याची देखील आवड आहे. श्लोकाने २०१५ मध्ये कनेक्ट फॉर या नावाने एनजीओ सुरू केली होती. या संस्थेतर्फे गरजूंना शिक्षण, भोजन आणि निवासाची व्यवस्था करुन देण्यात येते.

पुढील बातमी
इतर बातम्या