संवेदनशील अक्षय

मुंबई - संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखला जाणाऱ्या अक्षय कुमारनं आपल्या लौकिकाला साजेसं काम केलंय. निर्माता रवी श्रीवास्तव यांच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी अक्षय कुमार मदत करणार आहे. रवी श्रीवास्तव यांनीच अक्षय कुमारला पहिल्या सिनेमात संधी दिली होती. श्रीवास्तव काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना किडनी ट्रान्सप्लांटसाठी मदतीची गरज आहे. त्याबाबतचा एक लेख ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना अक्षय म्हणाला, “माझी टीम त्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे."

याबाबत मुंबई लाइव्हनं 17 ऑक्टोबरला बातमी दिली होती. श्रीवास्तव 1991 मध्ये आलेल्या ‘द्वारपाल’ या सिनेमाचे निर्माते होते. अक्षय कुमारचा हा पहिलाच सिनेमा होता. मात्र तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे अक्षयने ‘सौगंध’ या सिनेमाद्वारे करिअरची सुरुवात केली. सौगंधमध्ये अक्षयला भूमिका देण्यासाठी श्रीवास्तव यांनीच मदत केली होती.

आधीच्या बातमीसाठी इथे क्लिक करा - https://mumbailive.maharashtraalive.com/details/news/m/7/2059

 

 

पुढील बातमी
इतर बातम्या