राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेले 'फिर से' हे गाणे असलेला अल्बम जुहूच्या पीव्हीआरमध्ये लॉन्च करण्यात आला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत या गाण्याचे लाँचिंग करण्यात आले.
जीत गांगुली यांनी संगीत दिलेल्या या गाण्याचे लेखन रश्मी विराग यांनी केले आहे. तर अहमद खान यांनी गाण्याचा व्हिडिओ तयार केला आहे. या गाण्याचे शूटिंग मुंबईच्या ऑपेरा हाऊसमध्ये करण्यात आले होते. या गाण्यात अमृता फडणवीस महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ताल धरताना दिसत आहेत. यूट्युबवर रिलीज झालेल्या या गाण्याला लाखो प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. अमृता फडणवीस या एक क्लासिकल गायिका आहेत. यापूर्वी त्यांनी 'जय गंगाजल' या सिनेमातील 'सब धान माटी' हे गाणे गायले आहे.