पाडगावकरांच्या कवितेवरून वाद

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

दादर - मंगेश पाडगावकर म्हणजे महाराष्ट्राचे लाडके कवी. त्यांच्या कवितांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, पण त्यांची एक ‘मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी’ ही कविता काही कारणांमुळे वादग्रस्त ठरली आहे. त्यांची ही कविता त्यांची नाहीच असा दावा करण्यात आला आहे. 

पाडगावकरांच्या प्रथम स्मृतीदिनाचं औचित्य साधून चिंतामणी सोहोनी या गायक-संगीतकारानं या कवितेचं छानसं गाण तयार केलं. त्याची संकल्पना, दिग्दर्शन अभिनेता पुष्कर श्रोत्रीची आहे. या गाण्याचं गुरुवारी सावरकर स्मारकात प्रकाशन झालं. पण ही कविता पाडगावकरांची नसून ती धुळ्याचे कलेक्टर दिलीप पांढरपट्टे यांची असल्याची माहिती समोर आलीये. या संदर्भात दिग्दर्शक या नात्यानं पुष्कर श्रोत्री यांनी पांढरपट्टे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ‘मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी’ या काव्यपंक्ती आपल्या असल्याचं सांगत ही कविता आजवर कुठेही प्रसिद्ध झाली नाही, असंही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला दिग्दर्शक अभिजित पानसे, मनसेच्या चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्यासह त्यांची मुलं देखील उपस्थित होती. त्यांच्या मुलांना या कवितेविषयी विचारलं असता त्यांनाही कविता माहिती नसल्याचं समजलं. या सर्व प्रकारावरुन मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा खरी म्हणावी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

 

 

पुढील बातमी
इतर बातम्या