फिल्म फेअरवर अनिल कपूरचा मुलगा नाराज

मुंबई - मिर्जिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हर्षवर्धन कपूर सध्या नाराज आहे. त्याच्या नाराजीचे कारण आहे फिल्म फेअरमध्ये त्याला न दिलेला पुरस्कार. फिल्म फेअर पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये बेस्ट डेब्यू पुरस्काराच्या नामांकनात इतरांसोबत हर्षवर्धन कपूर याचे देखील नाव होते. मात्र उडता पंजाबमधील दिलजीत दोसांज याला बेस्ट डेब्यूचा पुरस्कार देण्यात आला आणि यामुळेच अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन नाराज झाला आहे. हर्षवर्धन याने सांगितले की, मी फिल्मफेअर सोडून इतर अनेक पुरस्कार जिंकलोय. पुरस्कार देताना लोकांचा कौल घेतला जातो. हा पुरस्कार कशा पद्धतीने दिला गेलाय असा प्रश्न देखील त्याने उपस्थित केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या