अनुराग कश्यपची सारवासारव

  • रेणुका गरकल & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

मुंबई - 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमावरून सुरू असलेल्या वादावर चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या ट्विटचं फेसबुकवर स्पष्टीकरण दिलंय. कश्यपने बुधवारी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ज्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की 'काही केलं किंवा न केलं तरीही बॉलिवूड इंडस्ट्रीलाच लक्ष्य केलं जातं', 'तसंच जर बॉलिवूडने एखाद्या राजकीय मुद्दयावर आपलं मत व्यक्त केलं नाही तर बॉलिवूडला त्यातलं काहीच माहीत नसल्याचं बोललं जातं' 'मात्र राजकीय मुद्द्यांमध्ये सामिल झाल्यास बॉलिवूड बळीचा बकरा बनून राहतो', 'पण मी माझ्या ट्विटमध्ये पंतप्रधानांंना माफी मागण्यास सांगितलेलं नाही' 'मला असं सांगावं लागत आहे'

रविवारी अनुरागन यांनी दिग्दर्शक करण जोहरची बाजू घेत ट्विट करून पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. त्यामुळं नेटीझन्सनी अनुराग यांना चांगलंच फटकारलं.

पुढील बातमी
इतर बातम्या