अर्जुन कपूरच्या जिमवर पालिकेचा हातोडा

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांच्या जेव्हीपीडी येथील राहत्या घरी असलेली अनधिकृत जिम महापालिकेनं तोडली. सोमवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती. के.पश्चिम विभागीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. 30 फूट बाय 16 चं हे अनधिकृत बांधकाम होतं. 5 मार्चला पालिकेने त्याला नोटिस बजावली होती. अर्जुन कपूरनं स्वत:हून बांधकाम तोडण्याची तयारी दाखवली होती, मात्र कुठलीही कार्यवाही त्याच्याकडून होत नसल्यानं पालिकेनं हे पाऊल उचललं. आता या कारवाईचा खर्चही महापालिका अर्जुन कपूरकडून वसूल करणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या