ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचं निधन झालं असून वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न आणि 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर (Younger Sister Of Legendary Lata Mangeshkar) यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले (Versatile Playback Singer Asha Bhosle) यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील (Hindi Film Industry) दिग्गज संगीतकार आरडी बर्मन (R. D. Burman), ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. 'दम मारो दम' आणि 'ओम शांति ओम' यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिलीत.

पुढील बातमी
इतर बातम्या