'बाहुबली: द लॉस्ट लेजंड्स' अॅनिमेटेड सिरीज

'कटप्पाने बाहुबलीला का मारलं?' या प्रश्नाचं उत्तर लवकरचं मिळणार आहे. काही दिवसांतच चित्रपटाचा पुढचा भाग 'बाहुबली २ - द कन्क्लूजन' हा प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वी दिग्दर्शक राजमौली यांनी आणखी एक घोषणा केली आहे. आता तुम्हाला वाटलं असेल की ते राजमौली 'बाहुबली ३' घेऊन येणार आहेत की काय? पण थांबा. हा तुमचा गैरसमज आहे. राजमौली आणखी एक 'बाहुबली' घेऊन येत आहेत. पण हा बाहुबली अॅनिमेटेड सिरीजमधून तुमच्या भेटीला येत आहे. 'अॅमेझॉन प्राईम'वर १९ मे नंतर तुम्हाला 'बाहुबली: द लॉस्ट लेजंड्स' अॅनिमेटेड' सिरीज पाहायला मिळणार आहे. बाहुबली अॅनिमेशन सिरीजचा टीझर 'अॅमेझॉन प्राईम'वर प्रदर्शित करण्यात आला आहे.

तुम्ही म्हणाल आता 'बाहुबली' चित्रपटाचे दोन भाग आल्यानंतर आता यात वेगळे काय असेल? मात्र या वेळी 'बाहुबली' अॅनिमेटेड सिरीजमध्ये तुम्हाला वेगळी स्टोरी पाहायला मिळणार आहे. 'बाहुबली' आणि 'बाहुबली २ - द कन्क्लूजन' या चित्रपटात तुम्हाला जे पाहायला नाही मिळालं, ते तुम्हाला यात पाहायला मिळणार आहे.

"बाहुबली अॅनिमेशन सिरीज आमचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट आहे. जेव्हा बाहुबली चित्रपटावर काम करायला सुरुवात केली तेव्हा बाहुबलीचे विश्व फक्त एक किंवा दोन भागात दाखवणे कठिण होते. त्यामुळे जे मला चित्रपटात दाखवता आले नाही ते मी या अॅनिमेटेड सिरीजमधून दाखवणार आहे," असे दिग्दर्शक राजमौली यांनी सांगितले.

"अॅनिमेशन सिरीजच्या माध्यमातून बाहुबली फ्रेंचायझीचा विस्तार करण्यात येत आहे. याचा मला आनंद आहे," असे अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ इंडियाचे संचालक नितेश कृपलानी यांनी स्पष्ट केले.

'बाहुबली २ - द कन्क्लूजन' हा चित्रपट 28 एप्रिल 2017ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभात, अनुष्का शेट्टी, राणा दगूबाटी आणि तमन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे आता या चित्रपटासोबतच या अॅनिमेटेड सिरीडचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या