विज्ञान प्रदर्शनात ‘बालमोहन’चे यश

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

दादर - दक्षिण मुंबई विज्ञान प्रदर्शन 2016 -17 नुकतचं पार पडलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेने या विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला. 6 वी ते 8 वी च्या कनिष्ठ गटामध्ये घरगुती व्हॅक्यूमक्लिनर बनवणाऱ्या 8 वी अ च्या प्रणाली सावंत आणि दुर्वा कांबळे या दोन विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकवला. शिक्षक संदेश पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला होता. या प्रदर्शनात मिळालेल्या यशामुळे बालमोहन शाळेने सलग 4 वर्ष यशाची ऐतिहासिक परंपरा राखली आहे. या प्रदर्शनाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 9 वी ते 12 वी या गटात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला देखील प्रथम क्रमांक मिळाला असून त्याचबरोबर शिक्षक प्रकल्पालाही प्रथम क्रमांक मिळाला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या