कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये बिग बॉस यांनी सोपवलेलं ‘द ग्रेट डिक्टेटर’ हे कार्य सुरू होतं. यात नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहे. परंतु, मेघाला बिग बॉसकडून मिळालेल्या आदेशानुसार प्रजेने काल हुकुमशहाविरोधात बंड पुकारलं.
हुकुमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणं, हुकुमशहा यांचा पुतळा नष्ट करणं, हुकुमशहा यांच्या डोक्यावर पाणी ओतणं, हुकुमशहा यांच्या विशेष रूममध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणं या बिग बॉस यांनी हुकुमशाही संपुष्टात आणण्यासाठी दिलेल्या कार्यामध्ये प्रजा यशस्वी ठरली आहे. त्यामुळेच ‘द ग्रेट डिक्टेटर’ या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. आता बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन कोण होणार? हे पाहायचं आहे.