बिग बॉसच्या घरात गुप्तहेर 'खुनी'ला ओळखणार का?

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात बुधवारी मर्डर मिस्ट्री हा टास्क रंगला. ज्यामध्ये आस्ताद आणि मेघा पाच खून करण्यामध्ये यशस्वी ठरले. आणि गुप्तहेर असलेल्या सुशांत आणि स्मिताला गुरुवारी होणाऱ्या टास्कमध्ये खुनी कोण हे पुराव्यानीशी सिद्ध करायचं आहे. तेव्हा हे दोघेही 'खुनी'ला ओळखणार का? हे बघणे उत्सुकतेचं असणार आहे.

म्हणून मेघा 'खुनी' बनली

बुधवारी रात्री बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मेघाचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी रेशम, सुशांत, जुई सगळ्यांनीच तिला केक भरवला आणि शुभेच्छा दिल्या. सई आणि तिच्यामध्ये झालेली कट्टी फु देखील संपल्याचं दिसून आलं. यादरम्यान मेघाने बिग बॉसकडे एक इच्छा व्यक्त केली होती. ज्यामध्ये तिला मर्डर मिस्ट्री या टास्कमध्ये खुनीची भूमिका करण्यास आवडेल, असं ती म्हणाली. यावेळी बिग बॉस यांनी मेघाची ही इच्छा कबूल देखील केली. त्यामुळे टास्कमध्ये आस्तादबरोबर मेघाला देखील खुनी बनण्याची संधी मिळाली.

आरोप सिद्ध करतील?

या टास्कमध्ये सुशांत आणि स्मिता गुप्तहेर आहेत. गुरुवारी होणाऱ्या भागात या दोघांना खुनी कोण आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करायचं आहे. तेव्हा स्मिता आणि सुशांत हे त्यांच्याजवळ असलेल्या पुराव्यानुसार आस्ताद आणि मेघाला प्रश्न विचारणार आहेत. कारण, गुप्तहेरांना पुरावे सापडले आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. पण प्रश्न असा आहे की, ते दोघे मेघा आणि आस्तादवर लागलेल्या आरोपांना सिद्ध करू शकतील का? 

कोण मारणार बाजी?

या टास्कमध्ये स्मिता किंवा सुशांत कोण मारणार बाजी? बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टनशिपसाठी उमेदवार म्हणून कोणाला संधी मिळणार? याची उत्तंर आजच्या भागात मिळतील.

कोण आहे SR?

बिग बॉस यांनी SR असे लिहिलेले सामान पाठवले आहे. त्यामुळे SR म्हणजे काय? असा प्रश्न घरातील सदस्यांना पडला? खरंतर SR म्हणजे शर्मिष्ठा राऊत कारण बिग बॉसच्या घरात शर्मिष्ठा राऊत एन्ट्री घेत असून ज्याची किंचतही कल्पना अद्याप घरातल्या सदस्यांना नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या