अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्डकडून धमकी

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक उत्कृष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अंडरवर्ल्डमधून धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी महेश मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. महेश मांजरेकर यांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी खंडणी मागणाऱ्याला रत्नागिरीतून अटक केली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने महेश मांजरेकर यांना खंडणीची धमकी मिळाली आहे. महेश मांजरेकर यांना ३५ कोटी रुपयांची डिमांड करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अटक केलेल्या आरोपीचं वय 34 असून तो खेडमधील रहिवासी आहे. आरोपीनं महेश मांजरेकर यांना बुधवारी खंडणीच्या धमकीचा फोन केला होता. यात खंडणी मागणाऱ्यानं ३५ कोटी रुपयांची डिमांड केली.

आरोपीनं अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाचा वापर केला. मात्र, आरोपी आणि अबू सालेम याचा काहीही संबंध नसल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. मात्र तरी देखील आरोपीचा अबू सालेमशी काही संबंध आहे का? ही माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.


हेही वाचा

विराट-अनुष्कानं दिली गुड न्यूज

अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचं कोरोनामुळे निधन

पुढील बातमी
इतर बातम्या