कर्करुग्ण मुलांचं ख्रिसमस सेलिब्रेशन

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

परळ - टाटा मेमोरिअल रुग्णालय आणि होप संस्थेच्या वतीनं कर्करोगानं ग्रासलेल्या लहान मुलांनी कलाकारांसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन केलं. आदित्य रॉय कपूर, सोनाली बेंद्रे, गणेश आचार्य, अमोल गुप्ते आणि प्रिया दत्त या कलाकारांसोबत रुग्णालयाच्या सभागृहात रविवारी ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात आलं.

या वेळी आदित्य रॉय कपूरने गिटारीवर सूर छेडताना कर्करोगाशी यशस्वी लढा दिलेल्या एका गायकासोबत 'ओके जानू' या चित्रपटातलं 'हम्मा हम्मा' हे गाणं गायलं. कर्करोगाशी लढा देणाऱ्या आणि कर्करोगावर मात केलेल्या मुलांनी त्यांच्या पालकांसाठी नृत्य, नाटक आणि संगीताच्या कार्यक्रमाचं सादरीकरण केलं. कार्यक्रमादरम्यान टाटा रुग्णालयातील मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख श्रीपाद बाणवली म्हणाले की, 30 वर्षांपूर्वी हा रोग जीवघेणा होता. आता त्या रोगावर मात करता येते आणि बहुतेक जण पूर्णपणे बरे होतात. पण कर्करोगाशी लढा देतानाचा या लहानग्यांचा प्रवास भयावह आणि कठीण असतो. 'होप'च्या माध्यमातून आम्ही या मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.

पुढील बातमी
इतर बातम्या