ब्रेकअपच्या बातम्यांनतरही 'ते' दोघे अडकले लग्नबंधनात

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'त्या' दोघांचं ब्रेकअप झालंचं नव्हतं. ती केवळ अफवा होती. कारण आज हे सत्य सगळ्यांसमोर आलंय. होय, आम्ही बोलतोय एका हटके कपलबद्दल अर्थात मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर यांच्या लग्नाबद्दल. हे लग्न थोडं हटके होतं. कारण नवऱ्या मुलाचं वय आहे ५२ वर्षे तर नवरीचं वय २७ वर्षे.

अलिबागमध्ये मिलिंद आणि अंकिताचा विवाह सोहळा मोजके नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पार पडला. दोन दिवसांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होतीया दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. यात दोघांचा रोमॅन्टिक अंदाज समोर आला आहेब्रेकअपच्या बातम्यांना बगल देत दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत.

लग्नात हे दोघं भलतेच खूष होते. त्यांच्यातील केमिस्ट्री पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांसमोर आली आहे. मागील दीड वर्षांपासून मिलिंद अंकिताला डेट करत होता. अंकिता ही मूळची दिल्लीची रहिवासी आहे. तिचं खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मिलिंद आणि अंकिता यांच्या वयात बरंच अंतर आहे. पण हे वय त्यांच्या प्रेमाच्या कधीच आड आलं नाही. मिलिंद त्याच्या फिटनेसबद्दल किती जागरूक असतो हे सगळ्यांनाच माहित आहे. आजपर्यंत तो अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला आहे. अंकितानेही २०१५ मध्ये मिलिंदसोबत १० हजार किमीची मॅरेथॉन पूर्ण केली होती


पुढील बातमी
इतर बातम्या