बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार “चोर पोलिसचा” खेळ!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये १ मे ला सगळ्या सदस्यांनी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. ज्यामध्ये मेघा धाडेची लावणी, रेशम आणि स्मिताचा धमाकेदार डांस, आस्ताद काळे तसेच प्रसेनजीत कोसंबीचं गाणे प्रेक्षकांना बघायला मिळालं. आज बुधवारी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर पोलिसचा खेळ रंगणार आहे.

या खेळामध्ये कोण विजयी ठरेल? घराचा नवा कॅप्टन कोण बनेल? घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये कोण नॉमिनेट होईल? हे बघणे रंजक असणार आहे.

चोर पोलिस खेळण्याची तयारी सुरू

लहानपणी आपण सगळ्यांनीच वेगवेगळे खेळ खेळले असतील आणि त्यातलाच एक म्हणजे चोर पोलीस... लहानपणीचा हा उत्कंठावर्धक खेळ गंमत म्हणून खेळला गेला असला तरी आता या घरामध्ये मात्र कॅप्टनसी, लक्झरी बजेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या खेळामधील स्पर्धकांचं पुढील अस्तित्व ठरवणार आहे. यामुळे सगळ्यांची चोर पोलिस खेळण्याची तयारी सुरू झाली.

कोण मारणार बाजी?

गोष्टी लपवणे, गोष्टी अशा ठिकाणी लपवणे जिथून त्या कोणाला मिळणार नाहीत. खेळ खेळताना कुठल्या गोष्टी करायला हव्यात, कुठल्या गोष्टी करू नये, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी या बाबतचे निर्णय घेण्यात येतील. आता कुठला संघ या खेळामध्ये बाजी मारणार? कोण नॉमिनेट होणार? हे बघणं रंजक असणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या