'माझ्या कुटुंबियांनीच माझा छळ केला', कॉमेडियन सिद्धार्थचा इन्स्टाग्रामवर खुलासा

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

कॉमेडियन सिद्धार्थ सागर गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता होता. आणि ही माहिती सिद्धार्थच्या एका मैत्रिणीने फेसबुक पोस्टद्वारे समोर आणली होती. पण नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ सुखरूप असल्याचं खुद्द त्यानेच इंस्टाग्रामवर सांगितलं आहे.

काय म्हणाला सिद्धार्थ?

गेले काही दिवस मी मानसिक त्रासाला सामोरे जात होतो. मी माझ्या कुटुंबाविरोधात पोसिलात तक्रार केली होती. यानंतर मला कुटुंबाकडून मानसिक त्रास दिला जाऊ लागला. सध्या मी जिथे आहे तीथे सुखरूप आहे. येत्या २ ते ३ दिवसांत मी मीडीयासमोर येऊन माझ्याबाबत काय घडलं होतं ते स्पष्ट करेन.

 

सिद्धार्थच्या मैत्रिणीचा खुलासा

सिद्धार्थच्या मैत्रिणीने सिद्धार्थ गायब असल्याची धक्कादायक माहिती सगळ्यांसमोर आणली होती. 'सेल्फी मौसी' अर्थात सिद्धार्थ सागर तुम्हाला आठवतोय का? गेल्या चार महिन्यांपासून तो बेपत्ता आहे. १८ नोव्हेंबर २०१७ ला त्याचं अखेरचं पाहिलं होतं. तो कुठं आहे? हे कुणालाच ठाऊक नाही. तो माझा खूप चांगला मित्र आहे, त्याला शोधण्यासाठी माझी मदत करा’. असं तिने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्यासोबतच सिद्धार्थचे काही फोटो तीने पोस्ट केले होते. मात्र सिद्धार्थच्या इन्स्टाग्रामच्या व्हिडीओनंतर तीने ही पोस्ट डिलीट केली.

सिद्धार्थ कृष्णा अभिषेक, सुदेश सेहरी यांच्यासोबत कॉमेडी सकर्स, लाफ्टर के फटके, कॉमेडी सर्कस के अजुबे यांसारख्या कॉमेडी शो मधून घराघरांत पोहचला. त्यानंतर द कपिल शर्मा शो मध्येही सिद्धार्थ झळकला होता. सेल्फी मौसी या त्याच्य भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या