कपिल शर्माला टक्कर देणार सुनील ग्रोवर

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील भांडणामुळे कॉमेडी विथ कपिल या शोचा टीआरपी घसरला आणि हा शो बंद पडला. पण कपिल शर्मा आता पुन्हा एकदा फॅमिली टाईम विथ कपिल या नवीन शो मधून सगळ्यांसमोर येत आहे. या शोमध्ये त्याच्याबरोबर सुनील ग्रोवर नसणार म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांची निराश झाली. पण प्रेक्षकांना काळजी करण्याची गरज नाही. कारण कपिल शर्माला टक्कर देण्यासाठी आता सुनील ग्रोवर लवकरच क्रिकेटवरील कॉमेडी शो मधून प्रेक्षकांसमोर येत आहे. 

या शोमध्ये आणखी कोण?

हा कार्यक्रम हॉटस्टार या वाहिनीवर प्रसारीत करण्यात येणार आहे. प्रिती आणि नीती सिमोज यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमात सुनील ग्रोवरबरोबर बिग बॉस ११ ची विजेती शिल्पा शिंदेही सहभागी होणार आहे. नुकतेच प्रितीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवर यांचे काही फोटो सुद्धा शेअर केेले.

 

मिळालेल्या माहितीनुसार या शोमध्ये सुनील ग्रोवर वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी सुनीलने साकारलेल्या गुथ्थी आणि डॉ. मशुर गुलाटी या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्याचप्रमाणे शिल्पाही वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या