जुलैपासून चित्रकरणाला होणार सुरूवात?

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांची संख्या घटत नसल्यानं राज्यात लॉकडाऊन वाढविण्यात आला असून हा लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात राज्य सरकारनं काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. तसंच, मनोरंजन उद्योगानंही शूटींग पूर्ववत सुरु करण्याच्या दिशेनं तयारी सुरु केली आहे.

जुलै महिन्यात चित्रपट आणि मालिकांचं शुटिंग सुरू करण्याच्या दृष्टिनं हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी सेटवर सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून देणे, अभिनेत्रींनी घरूनच मेकअप करून यावं अशी नियमावलीच सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा) तयार केली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर मनोरंजन उद्योग ठप्प पडला.

नव्या मालिकांचं, सिनेमांचं शूटींग थांबलं, आगामी सिनेमांचं प्रदर्शनही रोखलं गेलं. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये आलेली शिथिलता बघता, मनोरंजन उद्योगाच्या जीवात जीव आला आहे. केवळ इतकंच नाही तर येत्या दिवसांत शूटींग सुरु झाल्यानंतर शूटींगची योजनाही तयार झाली आहे. येत्या जुलैपासून शूटींगची परवानगी मिळू शकेल, अशी आशा मनोरंजन विश्वाला वाटते आहे. ही परवानगी मिळालीच तर अनेक निबंर्धासह शूटींग सुरु होणार असल्याची माहिती मिळते.

सोमवारी सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा) आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्प्लॉइजच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या जुलैपासून शूटींगची परवानगी मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. त्याशिवाय, या पार्श्वभूमीवर सेटवरच्या संभाव्य बदलांवरही चर्चा झाली. काही सुरक्षा निर्दशांचे पालन करून चित्रपट व मालिकांचे शूटींग सुरु करता येईल, यावर या बैठकीत एकमत झाल्याचं समजतं.

पुढील बातमी
इतर बातम्या