महेश भट्टने शेअर केला आलियाचा फोटो

मुंबई - ६२ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये अभिनेत्री आलिया भट्टला ‘उडता पंजाब’ या चित्रपटात तिने केलेल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

या गोष्टीचा सर्वात जास्त आनंद झाला असेल तर आलियाचे वडील महेश भट्ट यांना. आलियाला अवॉर्ड मिळाल्यानंतर महेश भट्ट यांनी चेहऱ्यावर स्मित असलेल्या, शांतपणे झोपी गेलेल्या आलियाचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. त्या फोटो बरोबरच त्यांनी आलियाची प्रशंसा करणारे आणि तिला प्रोत्साहित करणारे असे कॅप्शनही लिहिले होते. आलियाला उद्देशून त्यांनी लिहिले होते की,‘एकदा का तू निडर झालीस की आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी सीमा राहात नाहीत. माझ्या महान पण तितक्याच मोठ्या मुलीचे खूप खूप अभिनंदन.’

पुढील बातमी
इतर बातम्या