लग्नात डांन्स करून इंटरनेटवर रातोरात प्रसिद्ध होणारे संजीव श्रीवास्तव म्हणजेच डान्सिग अंकल यांनी मुंबईत एन्ट्री केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला त्यांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ बघून बॉलिवूड कलाकारांनीही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकीकडे गोविंदांने त्यांच्या या धमाल डान्सचं भरभरून कौतुक केलं आहे, तर दुसरीकडे अभिनेता सुनील शेट्टीने त्यांना भेटण्यासाठी मुंबईत बोलावलं आहे.
लग्नात गोविंदाच्या गाण्यावर डान्स करून सोशल मीडियावर खळबळ माजवणारे डान्सिंग अंकल उर्फ डब्बूजी हे भोपालमधील विदिशा या शहरातले राहणारे असून ते प्राध्यापक आहेत.
संजीव श्रीवास्तव यांनी 3 जूनला सकाळी ट्वीट केलं होतं. त्यांनी ट्वीट करून म्हटलं होतं की 'अभिनेता सुनील शेट्टी आपली भेट घेऊ इच्छित असून त्यांनी आपल्याला मुंबईत बोलावलं आहे. त्यामुळे आपण मुंबईला जाणार'. याव्यतिरिक्त त्यांनी त्यांचा मुंबईत पोहचल्यानंतरचा आणि सुनील शेट्टीसोबत भेटल्याचा फोटोही आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे.