फरहान अख्तरकडून ड्रीम ११ आयपीएलच्या क्रिकेट लाइव्हचं उद्घाटन

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर स्टार स्पोर्ट्स लाइव्ह ब्रॉडकास्टवर ड्रीम ११ (आयपीएल 2020)च्या पहिल्या सामन्याआधी 'क्रिकेट लाइव्ह'चं उद्घाटन करणार आहे.

COVID 19 च्या प्रादुर्भावामुळे सध्या देशात चिंतादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना घराबाहेर फिरायला जाणं, रेस्टॉरंटमध्ये जेवायचा जाण या सर्व गोष्टी टाळाव्या लागत आहेत. त्यात IPL सुरू  होत आहे. त्यामुळे मनोरंजनाचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. अर्थातच याचा फायदा नक्कीच IPL ला मिळेल. गेल्या काही वर्षांमध्ये IPL ची कमी झालेली प्रसिद्धी त्यांना पुन्हा मिळेल. 

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बहुप्रतीक्षित संघर्ष होण्यापूर्वी फरहान अख्तर 'क्रिकेट लाइव्ह'नं या स्पर्धेला सुरुवात करेल. तो आजच्या या परीक्षेच्या वेळेस संबोधित करेल.

स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाइव्हशी खास बोलताना फरहान म्हणाला, “ही एक अवघड वेळ आहे आणि आपला देश सतत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जगातील 'न्यू नॉर्मल' सोबत पुढे जात आयपीएलची घोषणा म्हणजे ताज्या हवेत श्वास घेण्यासारखी आहे. संघ किंवा व्यक्तीच्या वैयक्तिक प्रवासामधून बरेच काही शिकायला मिळते. पडणे, उठणे, चुकांमधून शिकणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मैदानाशी जोडलेलं राहणं आणि विजयानंतरही नम्र असणं हे सर्व शिकायला मिळते. 

वैयक्तिकरित्या, एमआय आणि सीएसके यांच्यात बहुप्रतिक्षित आयपीएल चकमकीचे साक्षीदार होण्यासाठी 'स्टार्ट स्पोर्ट्स'चा पहिला कार्यक्रम 'क्रिकेट लाइव्ह'चं उद्घाटन करण्यातही मला आनंद वाटतो. भव्य सलामीच्या खेळासाठी मी उत्साहित आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या