कविता असते स्वयंप्रकाशित

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

दादर - " कवितेला प्रकाश लागत नाही. ती स्वयंम प्रकाशित असते. हा प्रकाश निर्माण करणारे कवी जर कवितेच्या माध्यमातून मानवतेच्या अाशा, आकांक्षा, वेदना व दुःख मांडणारे तसेच समाजाला जागृत करणाऱ्या असतील तर अशांचा गौरव होणे गरजेचे आहे". असे उद्गार पद्मश्री मधूमंगेश कर्णिक यांनी आबा शेवरे यांच्या गौरव सोहळ्यावेळी काढले.

आ. सो. शेवरे गौरव समितीच्यावतीने दादर, पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय गावसकर सभागृहात शनिवारी आबा शेवरे यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेवरेना गौरव म्हणून मानपत्र, गौतम बुद्धांची प्रतिमा आणि 1 लाख 60 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यानिमित्त कवी आबा शेवरे यांनी लिहिलेल्या 'झिरो बॅलन्स असलेलं माझं पासबुक', अंधारातल्या जागल्या (निवडक कविता) आणि न सांगितलेली गोष्ट या तीन काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत सतीश काळसेकर, कवी उर्मिला पवार, अजय कांडर, संध्या तांबे, महेंद्र भवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या