मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाच्या (bombay high court) औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी साई बाबा संस्थान ट्रस्टला ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना आर्थिक मदत (financial help) करण्याची परवानगी दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी सेप्सिस आजाराने ग्रस्त आहेत.
86 वर्षीय सुधीर दळवी (sudhir dalvi) हे मनोज कुमार यांच्या 1977 मध्ये आलेल्या 'शिर्डी के साई बाबा' या चित्रपटात साई बाबांच्या (sai baba) भूमिकेत झळकले आहेत. या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड आदर आणि प्रसिद्धी मिळाली.
सुधीर दळवी यांच्या चालू वैद्यकीय खर्चासाठी 11 लाख रुपये देण्याची परवानगी मिळावी यासाठी शिर्डी (shirdi) साई बाबा संस्थान ट्रस्टने न्यायालयात धाव घेतली होती.
मागील निर्देशांनुसार, संस्थानाला विशिष्ट रकमेपेक्षा जास्त आर्थिक मदत करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला होता की सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे उपचाराचा खर्च भागविण्यासाठी मदतीची आवश्यकता असल्याचे याचिकेत म्हटले होते.
या याचिकेचा आढावा घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने ट्रस्टला आर्थिक मदत करण्यास परवानगी दिली. न्यायालयाने याचिकेत नमूद केले की, मानवतेच्या दृष्टीने गरजूंना मदत करणे याेग्य असल्याचे न्यायालयाने याचिकेत नमूद केले आहे.
सुधीर दळवी यांनी साकारलेले साई बाबांचे पात्र भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात संस्मरणीय पात्र आहे.
सुधीर दळवी यांच्या उल्लेखनीय आणि सहानुभूतीपूर्ण अभिनयाने चित्रपटाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांच्या मनात आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची प्रतिमा मजबूत केली.
चाहते आणि हितचिंतकांनी त्यांच्या बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे. तसेच या आर्थिक मदतीमुळे अभिनेत्याच्या कुटुंबावरील भार कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.