भांडुपकर अमेयची परदेशवारी

नरदासनगर - आवाजाच्या मागे दडलंय काय, याचा शोध घेत सांऊड टेक्निशियन बनलेल्या भांडुपकर तरुणानं थेट अमेरीकेचंही लक्ष वेधून घेतलं आहे. अमेरीकेतील राॅयल कॅरेबियन या बड्या शिपिंग कंपनीनं त्याची निवड केली अाहे.

भांडुपच्या नरदासनगरमधील छोट्याशा चाळीमध्ये राहणाऱ्या पत्रकार किशोर गावडे यांचा मुलगा अमेय. चाळीमध्ये वाढलेल्या अमेयने लहानपणापासूनच उराशी मोठी स्वप्न बाळगली होती. भांडुपमध्येच शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्याने प्रचलित शिक्षणाच्या वाटा सोडून तांत्रिक शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. तात्रित शिक्षण घेत पुढे तो साऊंड इंजिनियर बनला. या क्षेत्रात असलेल्या करियरच्या संधी त्याची वाटत पाहत होत्या. वेगवेगळ्या इव्हेंन्ट मॅनेजमेंट कंपन्यांसोबत तब्बल ५ वर्षे साऊंड टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या अमेय याला आहुजा ग्रुपमध्ये प्रोडक्ट स्पेशालिष्ट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याच संधीचे सोने त्याने केले.

पुढील बातमी
इतर बातम्या