मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास आता एका क्लिकवर

मुंबई - मराठी चित्रपटांचा इतिहास ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’ (marathifilmdata.com) या संकेतस्थळाच्या निमित्ताने आता सिने रसिकांना आणि अभ्यासकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ‘व्ही. शांताराम फाउंडेशन’चे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या पुढाकाराने या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. १५ व्या एशियन फिल्म फेस्टिव्हलच्या सांगता समारंभात ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’ (marathifilmdata.com) संकेतस्थळाचे उद् घाटन ख्यातनाम दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या हस्ते करण्यात आलं.

‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’ (marathifilmdata.com) या संकेतस्थळावर १९३२ ते २०१३ दरम्यानच्या चित्रपटांची नोंद पहायला मिळणार आहे. यात चित्रपटाची निर्मिती संस्था, निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, गीतकार, संगीतकार, गायक, कला दिग्दर्शक, संकलक आदी तंत्रज्ञांची सविस्तर माहिती उपलब्ध होईल. ‘विशेष’ या सदरात त्या-त्या सिनेमाचे वैशिष्ट्य अधोरेखित करण्यात आले असून ‘अतिथी कट्टा’ सदरात चित्रपटासंबंधित विविध माहितीचा आस्वाद रसिकांना घेता येईल. या संकेतस्थळाच्या सर्च इंजिनमध्ये एखाद्या दिग्दर्शक अथवा कलावंताचे नाव टाकले असता त्यांच्याशी संबंधित चित्रपटांची यादी सहज उपलब्ध होऊ शकते. या संकेतस्थळामुळे प्रत्येक कलाकारांसोबत तंत्रज्ञानाची माहितीही उपलब्ध होणार आहे. ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’ (marathifilmdata.com) या संकेतस्थळाच्या निमित्ताने वडिलांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचं समाधान किरण शांताराम यांनी या वेळी व्यक्त केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या