'नकळत सारे घडले'च्या सेटवर रंगली आईस्क्रीम पार्टी!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

सध्या कडाक्याच्या उन्हानं जिवाची काहिली होत आहे. रोजची कामं करायचाही आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. मालिकेच्या सेटवर तर २४ तास काम सुरू असतं. कितीही उन्हाळा असला तरी हे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कायम तयार असतात. मात्र कामातील पाच मिनिटांचा विरंगुळा वातावरण थंड करतो. असंच काहीसं घडलंय ते स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' मालिकेच्या सेटवर.

या उन्हाळ्याचा तडाका कमी करण्यासाठी 'नकळत सारे घडले'च्या सेटवर आईस्क्रीम पार्टी रंगली. या आईस्क्रीम पार्टीमुळे फक्त वातावरणातच नाही तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

'नकळत सारे घडले' मालिकेच्या सेटवर नेहमीच कौटुंबिक वातावरण असतं. इथे धम्माल मस्ती ही नेहमीच सुरू असते. अचानक सेटवर आलेलं आईस्क्रीम बघून संपूर्ण टीमने आयस्क्रिमवर ताव मारला.

आमच्या सेटवर आइसक्रीम, कोल्ड्रिंगची पार्टी नेहमीच रंगत असते. अशा छोट्या छोट्या पार्टीमुळेच सेटवरील वातावरण कायम छान राहतं. सेटवर एक नियम आहे. जर सेटवर कोणाचा मोबाईल वाजला तर संपूर्ण युनिटला त्या व्यक्तीला पार्टी द्यावी लागते. त्यामुळे अशा छोट्यामोठ्या पार्ट्या सेटवर होत असतात.

हरिश दुधाडे, अभिनेता

पुढील बातमी
इतर बातम्या