तरूणाईच्या उत्साहात आयएनटी रंगला

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

चर्चगेट - 26 सप्टेंबरपासून आयएनटीच्या प्राथमिक फेरीला सुरूवात झाली आहे. तरूणाईच्या सळसळत्या उत्साहात आणि जल्लोषात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ऑडिटोरियम सध्या दुमदुमन जात आहे. कॉलेजविश्वात महत्वपूर्ण आणि मानाच्या ठरल्या जाणाऱ्या 44व्या आयएनटी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या तालीम फेरी रंगल्या आहेत. नव्या युगाशी भाष्य करणारे नवे विषय, नवे प्रश्न घेऊन तरूण त्यांच्या एकांकिकांच सादरीकरण करत आहेत.

रामनारायण रूईया कॉलेजची 'लैला ऑन द रॉकस' ही एकांकिका डॉ. अरुण कोल्हटकर यांच्या लैला कवितेवर आधारली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' फेम ललित प्रभाकर याने याचे दिग्दर्शन केले आहे. त्याचप्रमाणे डी. जी. रूपारेलच्या 'चोरबाजार'मधून विनोदी पद्धतीने 90व्या शतकातील रमेश मंत्री यांची कथा सादर होत आहे. मंगळावर जाऊ पाहणारा आपला देश मासिक पाळीला अमंगळ का मानतो? असा प्रश्न उपस्थित करणारी कथा मांडण्यात आलीय.

'पृथ्वीमोलाची'मधून अरूणाचलम मुरूगनंतम यांची कथा एसआयईएस महाविद्यालयाने मांडली आहे. सी. एच. एम ने 'विभावांतर'मधून जातीव्यवस्थेवर टीका केली आहे. तर गुरूनानक खालसा कॉलेजने 'ऑरगॅजम'मधून पीअर प्रेशर आणि आजच्या तरुणाईच्या मनातली प्रेमाची संकल्पना यावर भाष्य केल आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या