'खतरों के खिलाडी'च्या चित्रीकरणादरम्यान रोहित शेट्टीला दुखापत

  • शिव कटैहा & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

बॉलिवुड चित्रपटांना अॅक्शन सीन्सची खरी ओळख करून देणारा रोहित शेट्टी एका नव्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्टंटमॅन, दिग्दर्शक, निर्माता अशा अनेक भूमिका निभावल्यानंतर रोहित शेट्टी एका शोचा होस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालनाची धुरा रोहित सांभाळणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा लाँच सोहळा पार पडला. या वेळी रोहितनं 'सिंघम' चित्रपटाच्या टायटल साँगवर एन्ट्री मारली. पण स्टंटबाजी करत एन्ट्री मारण्याच्या नादात रोहित शेट्टी जखमी झाला. पण रोहित शेट्टीनं काही झालंच नसल्याचं दाखवत दुखापतीकडे दुर्लक्ष केलं. यावेळी रोहित शेट्टीनं पत्रकारांच्या प्रश्नांनाही बिनधास्त उत्तरं दिली.

डरना मना है
मी १६ वर्षांचा असल्यापासून वडिलांसोबत (एम. बी. शेट्टी) स्टंट करायचो. त्यामुळे माझ्या मनातील भिती निघून गेलीय. स्टंटबाजीत माझा हात एवढा पक्का झाला आहे की मला त्यातील सर्व टेक्निक माहीत झाल्या आहेत. पण अजिबात भिती वाटत नाही असं नाही. थोडी भिती सर्वांनाच वाटणं सहाजिकच आहे. स्वत: स्टंट करताना किंवा दुसऱ्याला स्टंट करताना पाहून हृदयाचे ठोके चुकतात.

स्पेनमध्ये रंगणार थरार
'खतरो के खिलाडी' स्पेनमध्ये स्टंटबाजी करताना दिसतील. सुरक्षेच्या दृष्टीनं आम्ही पूर्ण तयार आहोत. छोट्या-मोठ्या दुखापती तर होतच असतात. जशी की माझ्या हाताला आता दुखापत झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये सहभागी झालेले कलाकार हे वेगवेगळ्या फील्डचे तर आहेतच शिवाय ते ट्रेन नाहीत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे.

देखे जरा किसमें कितना है दम
शोमध्ये सहभागी कलाकारांमध्ये एक्स फॅक्टर आहे. गीता फोगट या शोमध्ये सहभागी होणार आहे. गीता मुळात स्पोर्ट्समधून आली असून तिने रेसलिंगमध्ये देशाची मान उंचावली आहे. पण गीता आता इथे कशी परफॉर्म करते हे पहायचे आहे. सर्वच सहभागी कलाकार कसे परफॉर्म करतात हे मला पाहायचे आहे.

दिवाळीतच गोलमाल अगेन
दिवाळीत रजनीकांत यांचा '२.൦' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'गोलमाल अगेन' दिवाळीत प्रदर्शित होणार की नाही? याबाबत चर्चा सुरु झाली होती. मात्र 'गोलमाल अगेन' दिवाळीतच प्रदर्शित होईल, असं सांगत रोहितने या चर्चांना पूर्णविराम दिला. 

'गोलमाल अगेन' चित्रपटाचे चित्रीकरण दिवाळीच्या आधी पूर्ण होईल की नाही याबाबत आम्ही शाश्वत नव्हतो. कारण अजय देवगन 'बादशाहो' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. पण 'गोलमाल अगेन'चं चित्रीकरण दिवाळीच्या आधी पूर्ण होईल. त्यामुळे दिवाळीतच गोलमाल अगेन प्रदर्शित होईल, असे रोहितने सांगितले.

सर्व चित्रपट बाहुबली नाही होऊ शकत
बाहुबलीचा पहिला भाग सर्वांना आवडला. कटप्पानं बाहुबलीला का मारलं? हा प्रश्न पूर्ण देशाला सतावत होता. अखेर 'बाहुबली २' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना त्याचं उत्तर मिळालं. 'बाहुबली २' फक्त भारतातच नाही तर परदेशातही गाजला. चित्रपटानं १൦൦൦ करोडचा टप्पाही पार केला. 

आता बॉलिवुडमध्येही १൦൦൦ चा टप्पा पार करण्याची शर्यत लागेल. प्रत्येक जण 'बाहुबली'सारखा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करेल. पण ते शक्य नाही. प्रत्येक चित्रपट 'बाहुबली' नाही होऊ शकत. 'बाहुबली' चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी चांगला चित्रपट बनवला आहे. चित्रपटाला तंत्रज्ञानाची साथ मिळाली त्याचंही श्रेय राजामौली यांनाच दिलं पाहिजे, असंही यावेळी रोहित शेट्टी म्हणाला.

पुढील बातमी
इतर बातम्या