इरफान खानचा मुलगा बाबीलचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करतोय. अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्माच्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटातून बाबीलचे पदार्पण होत आहे.

अनुष्का शर्माचे प्रॉडक्शन हाऊस 'क्लीन स्लेट फिल्म्स'ने पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सशी हातमिळवणी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, 'काला' हे या चित्रपटाचं नाव असून हा एक थ्रिलरपट असेल.

या चित्रपटात बाबीलची मुख्य भूमिका असून 'बुलबुल' चित्रपटात झळकलेली तृप्ती डिमरी त्याच्यासह झळकणार आहे. तर अन्विता दत्त या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. अभिनेत्री स्वस्तिक मुखर्जीदेखील 'काला'मध्ये बाबील आणि तृप्ती यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

यापूर्वी बाबीलनं २०१७ मध्ये आलेल्या वडील इरफान खानच्या 'करीब करीब सिंगल' या चित्रपटासाठी कॅमेरा असिस्टंट म्हणून काम केलं होतं. बाबील आणि तृप्तीनं त्यांच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं आहे. पहिले शेड्यूल त्यांनी गुलमर्ग इथं नुकतेच पूर्ण केलं आहे. नुकताच चित्रपटातील सेटवरील एक फोटो समोर आला आहे.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खानला जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला तेव्हा बाबील हा पुरस्कार स्वीकारताना भावुक झाला होता.


हेही वाचा

'हे' १३ सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात

पुढील बातमी
इतर बातम्या