मांजरेकरांच्या सिनेमात सोनल चौहान

‘जन्नत’ या सिनेमात इमरान हाश्मीसोबत रोमांस करत बॅालिवूडमध्ये दाखल झालेली अभिनेत्री सोनल चौहान सध्या एका हिट सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे. अशातच तिला दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमात काम करण्याची संधी लाभली आहे.

‘जन्नत’नंतर हिंदीसोबतच कन्नड, मल्याळम आणि तेलुगू सिनेमांमध्ये रमलेल्या सोनलकडे सध्या एक महत्त्वाचा हिंदी सिनेमा आहे. दिग्दर्शक ज्योती प्रकाश दत्ता म्हणजेच जे. पी. दत्ता यांच्या ‘पलटन’ या सिनेमात सोनल झळकणार आहे. या सिनेमाकडे डोळे लावून बसलेल्या सोनलने नुकताच मांजरेकरांचा आगामी सिनेमाही साइन केला आहे.

मागील काही वर्षांपासून मराठी सिनेमांमध्ये बिझी असलेले मांजरेकर पुन्हा एकदा हिंदीकडे वळले आहेत. त्यांच्या आगामी हिंदी सिनेमाचं नाव अद्याप निश्चित झालं नसलं तरी कलाकारांची निवड मात्र झाली आहे. या सिनेमात विद्युत जामवाल आणि श्रुती हसन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या सिनेमात सोनलचीही अधिकृत एंट्री झाली आहे.

या सिनेमात सोनल चंद्रमुखी नावाच्या व्यक्तिरेखेत दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. अंडरवर्ल्ड गँगस्टर ड्रामा असलेल्या या सिनेमासाठी सोनलने रिहर्सलही सुरू केल्याचं समजतं. या सिनेमात सोनलवर काही इंटेन्सही चित्रीत केले जाणार असून कॅरेक्टरमध्ये जीव ओतण्यासाठी ती सध्या रंगभूमीवरील कलाकारांसोबत रियाज करत असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं.

पुढील बातमी
इतर बातम्या