जस्टिन बिबर मुंबईत येतोय!

मुंबई - तुम्ही जस्टिन बिबरचे फॅन आहात? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅनेडियन गायक जस्टिन बिबर 10 मे ला मुंबईमध्ये येतोय. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे आयोजित रॉक कॉन्सर्टमध्ये तो गाणारही आहे. व्हाईट फॉक्स इंडियाचे संचालक अरुण जैन यांनी जस्टिन भारतात येत असल्याची अधिकृत घोषणा केलीय. या दौऱ्यादरम्यान जस्टिन 'व्हेयर आर यू नाऊ', 'बॉयफ्रेंड', 'लव युअर सेल्फ', 'कंपनी', 'अॅज लाँग अॅज यू लव मी', 'व्हॉट डू यू मीन' आणि 'बेबी' या गाण्यांवर परफॉर्म करणार आहे. या कॉन्सर्टला बॉलीवूड कलाकार, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित असतील. मुंबईतही मोठ्या प्रमाणावर जस्टिनचे चाहते असल्यामुळे त्याचा हा भारत दौरा चाहत्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच ठरणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या