के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

तेलुगू, तमीळ आणि हिंदी चित्रपट सृष्टीचे निर्माते ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते के. विश्वनाथ यांना २൦१६चा केंद्र सरकारचा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. सुवर्ण कमळ, १൦ लाख रुपये रोख आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ३ मे २൦१७ ला के. विश्वनाथन यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल.

केद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या पुरस्काराची घोषणा ट्विटरवर केली आहे.

के. विश्वनाथ यांचा जीवन प्रवास

के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. यासाठी अभिनंदन, असे ट्विट के. नायडू यांनी केले.

के. विश्वनाथ यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९३൦ मध्ये आंध्र प्रदेशमधल्या गुंटूर येथे झाला.

के. विश्वनाथ यांनी तेलगू, तमीळ आणि हिंदी चित्रपट सृष्टी गाजवली

अभिनयाबरोबरच त्यांनी चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं

चेन्नईतील स्टुडिओत तंत्र सहाय्यक म्हणून चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं

के. विश्वनाथ यांनी दिग्दर्शित केलेले हिंदी चित्रपट
सरगम (१९७९)
कामचोर (१९८२)
संजोग (१९८५)
जाग उठा इन्सान (१९८५)
ईश्वर (१९८९)
संगीत (१९९२)
धनवान (१९९३)

त्यांना मिळालेले पुरस्कार
पाच राष्ट्रीय पुरस्कार
वीस नंदी पुरस्कार
१൦ फिल्मफेअर पुरस्कार
पद्मश्री पुरस्कार

पुढील बातमी
इतर बातम्या