वरळीत कामगार कल्याण नाट्यकला महोत्सव

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

वरळी - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या 64 व्या नाट्य कला महोत्सवाचा बक्षीस समारंभ गुरुवारी झाला. वरळीच्या ललित कला भवन येथे गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. 16 डिसेंबर ते 11 जानेवारी दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते संजय खापरे उपस्थित होते. याच रंगमंचावरुन आपल्या नाटकाची सुरुवात झाली असल्याची एक आठवण संजय खापरे यांनी या वेळी सांगितली. तसंच या ललित कला भवनाची दुरवस्था पाहून असं वाटतं की पुरातत्व खात्याकडे हे भवन जाण्याआधी त्याची दुरुस्ती व्हावी अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

सर्वोत्कृष्ट नाट्य प्रयोग -

प्रथम क्रमांक 'काळाघोडा' रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर
द्वितीय क्रमांक 'परीसस्पर्श' भारत पेट्रोलियम
तृतीय क्रमांक 'आज महाराष्ट्र दिन आहे' ललित कला भवन, वरळी

 

पुढील बातमी
इतर बातम्या