coronavirus : बॉलिवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव, 'या' गायिकेला झाला कोरोनाचा संसर्ग

कोरोना व्हायरस अहवालात बॉलिवूडची ख्यातनाम गायिका कनिका कपूरची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तिला लखनऊच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच ती लंडनहून परतली होती. विमानतळावर तिची तपासणी करण्यात आली. त्यात ती नेगेटिव्ह आली. कुठली लक्षणंही तिच्यात दिसत नव्हती. धक्कादायक म्हणजे यानंतर ती एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली आणि तिकडे पार्टी देखील दिली होती.

कनिका कपूरनं यासंदर्भात इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे. त्यात ती म्हणाली की, चार दिवसांपूर्वी मला लक्षणं आढळली. त्यानंतर मी तपासणी केली. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली. मी आणि माझे कुटुंब सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. आम्ही योग्य ते उपचार घेत आहोत. मी ज्यांच्या संपर्कात आली त्यांची देखील तपासणी सुरू आहे.

दहा दिवसांपूर्वी मी आले तेव्हा माझी विमानतळावर तपासणी करण्यात आली. तेव्हा माझ्यात कुठलीही लक्षणं आढळली नाहीत. शिवाय विमानतळावर स्कॅन केल्यावर मी नेगेटिव्ह असल्याचं सांगितलं. पण ४ दिवसांपूर्वीच माझ्यात कोरोनाची लक्षणं आढळून आली.

नागरिकांनी घाबरू नका. काळजी करायचं काही कारण नाही. तुमच्यात अशी लक्षणं आढळली तर तुम्ही स्वत: क्वारंटाईन व्हा. डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या, असा मेसेज कनिकानं इन्स्टावर दिला आहे.

कनिका कपूर हे बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. तिनं बेबी डॉल मे सोनेदी यासारख्या प्रसिद्ध गाण्यांना आपला आवाज दिला आहे. या व्यतिरिक्त, कनिका काही रिअॅलिटी शोचा देखील भाग होती.

भारत सरकारच्या प्रयत्नात असतानाही कोरोना विषाणूची व्याप्ती पसरत आहे. त्यापासून बचाव करण्याबाबत देशात प्रत्येक मार्गानं खबरदारी घेतली जात आहे. परंतु नवीन रुग्णांची संख्या सातत्यानं वाढताना दिसून येत आहे. देशात आतापर्यंत एकूण १९५ केसेस समोर आले आहेत. त्यापैकी १३३ भारतीय आहेत. तर ३२ परदेशी नागरिक आहेत.

बॉलिवूड स्टार्स देखील हा गंभीर आजार टाळण्याचा सल्ला देत आहेत आणि खबरदारी म्हणून स्वत:ला वेगळं ठेवत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर अलीकडेच तिचा पती आनंद अहूजासह लंडनहून परतली आहे. तो म्हणतो की, लंडनमध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी योग्य स्क्रीनिंग सुविधा नाहीत.

लंडनहून नुकतीच आलेल्या सोनम कपूरनं भारतातील विमानतळावरील स्क्रिनिंग पाहून भारतीय अधिकाऱ्यांचं कौतुक केलं. लंडनमध्ये इतकी चांगली व्यवस्था केलेली नाही. भारतात परत आल्यावर त्यांना भरण्यासाठी एक फॉर्म देण्यात आला होता. ज्यामध्ये त्याला आपल्या शेवटच्या २५ दिवसांचा तपशील देण्यास सांगण्यात आलं होतं.


पुढील बातमी
इतर बातम्या