करिनाचे पुनरागमन फॅशन शोद्वारे

मुंबई - अभिनेत्री करिना कपूर आपली बाळंतपणाची रजा संपवून पुन्हा लवकरच कामाला सुरुवात करणार आहे. चित्रपटसृष्टीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉकद्वारे करिना आपले पुनरागमन करील. हा शो मुंबईतच होणार असला तरी त्याच्या तारखा अद्यापपर्यंत जाहीर झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे करिनाने आपल्या गरोदरपणात अगदी नवव्या महिन्यापर्यंत काम करणे सुरू ठेवले होते. फॅशन शो झाल्यानंतर ती आणखी काही नवीन चित्रपट स्वीकारण्याची शक्यता आहे. गेल्या 20 डिसेंबरला करिनाला पुत्रप्राप्ती झाली होती. मात्र त्याचे तैमूल अली खान या नामकरणामुळे मोठे वादंग माजले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या