अभिनेता सचिन पिळगावकर यांना जीवन गौरव पुरस्कार !

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

मलबार हिल - गुढी पाडव्याच्या निमित्ताने संतोष परब यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेला 'श्री महाराष्ट्र देशा' या मराठमोळ्या सांस्कृतिक अविष्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीला सोनेरी दिवस आणणारे, ५൦ वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे, गायक, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सचिन यांना मुबंईचे माजी नगरपाल किरण व्ही. शांताराम यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. मलबार हिल सिटीजन्स फोरम यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

सचिन पिळगावकर यांची कारकिर्द

  • सचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ मध्ये मुंबईत एका मराठी कुटुंबात झाला
  • १९६२ मध्ये 'हा माझा मार्ग एकला' या मराठी चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका. त्यावेळी ते अवघे ४ वर्षांचे
  • 'हा माझा मार्ग एकला' या चित्रपटातील भूमिकेसाठी राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार
  • हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्या 'मंझली दीदी'त भूमिका
  • देवानंदचा प्रेम पुजारी, ज्वेलथीफ, शम्मी कपूरचा ब्रह्मचारी, मेला अशा ६५ हिंदी चित्रपटांत भूमिका
  • 'श्री कृष्ण' सिनेमात कृष्णाची भूमिका. हा चित्रपट त्यांच्यासाठी लक्षवेधी ठरला
  • 'गीत गाता चल', 'बालिकावधू', 'कॉलेज गर्ल', 'अखियों के झरोकों से' आणि 'नदीया के पार' चित्रपटांतील भूमिकेला विशेष पसंती
  • सहाय्यक कलाकार म्हणून 'त्रिशूल', 'शोले', 'सत्ते पे सत्ता', 'जुदाई', 'अवतार' अशा चित्रपटांमध्ये भूमिका
  • 'अशी ही बनवा बनवी' या मराठी चित्रपटातील भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती
  • पत्नी सुप्रिया आणि रीमा लागू यांच्यासोबत पहिली मालिका 'तू तू- मैं मैं'
  • 'चलती का नाम अंताक्षरी'त पहल्यांदा सूत्रसंचालन केले
  • सुप्रियाच्या साथीत 'नच बलिये' रिअॅलिटी शोचे पहिल्या पर्वाचे विजेतेपद

या वेळी नालासोपाऱ्याहून आलेल्या मराठेशाही ढोल-ताशा पथकानं कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली.

पुढील बातमी
इतर बातम्या