उषा मंगेशकर यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

मुंबई - ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते सोमवारी त्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या पुढाकाराने विद्यावैभव प्रकाशन या संस्थेने सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

मंगेशकर कुटुंबियांच्या संगीताची जादू भौगोलिक सीमा ओलांडून अनेक देशात पोहोचली असून, संपूर्ण मंगेशकर कुटुंब देशाचे जगातिक सांस्कृतिक दूत असल्याचे विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितले. उषा मंगेशकर यांची अनेक गाणी आज अनेक वर्षांनंतरही लोकांच्या मनात ताजी असल्याचं ते म्हणाले.


यावेळी अभिनेत्री जुही चावला यांना ‘विद्या वैभव’ प्रकाशनतर्फे ‘उषा वैभव’ पुरस्कार देण्यात आला, तर नेमबाज तेजस्विनी सावंत यांना वैभव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला रामराजे नाईक-निंबाळकर, मीना खडीकर, रीमा लागू तसेच विद्यावैभव प्रकाशनचे पराडकर कुटुंबीय उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या