महाराष्ट्र शाहिरी लोककला महोत्सव उत्साहात साजरा

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

काळाचौकी - ठाण्यातील महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचा 10 वा वर्धापन दिन 'महाराष्ट्र शाहिरी लोककला महोत्सव 2017' यंदा प्रथमच मुंबईतील काळाचौकी अभ्युदय नगर येथील शहिद भगतसिंग मैदानात रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य आयकर आयुक्त संजय कुमार पात्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक मधुसूदन सुगदरे, सचिव विनोद नाखवा आदी उपस्थित होते.

यंदाच्या या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांचे पोवाडे, लोकगीते, लावणी, लोकनृत्य आणि कोळीनृत्य सादर करण्यात आली. यात शाहीर शांताराम चव्हाण, मधुकर खामकर, दत्ता ठुले, रमेश नाखवा, कृष्णकांत जाधव, शांताराम धनावडे, निलेश जाधव, बाल शाहीर पृथ्वीराज माळी यांनी शाहिरी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तर लोककलावंत विनोद नाखवा लोकनृत्य आणि कोळीनृत्यांचा मनमुराद आस्वाद प्रेक्षकांनी लुटला.


दरम्यान सिने अभिनेत्री जयश्री टी, किशोरी अंबिये, सिनेअभिनेते याकूब सईद, मिलिंद गवळी, पार्श्वगायिका पुष्पा पागधरे, नाट्य निर्माते उदय धुरत, नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, लोककलेचे अभ्यासक गणेश चंदनशिवे, प्रसिद्ध ढोलकी वादक निलेश परब आदी कलावंतांना महाराष्ट्र लोकगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या