'ही' आहे सिद्धार्थ चांदेकरची व्हॅलेंटाईन!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

बुधवारी १४ फेब्रुवारीला प्रत्येक तरुण तरुणी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात गुंग होते. मग यात कलाकार मंडळी तरी कसे मागे राहतील? गेल्या काही दिवसांपासून 'काहे दिया परदेस' फेम शिव म्हणजेच ऋषी सक्सेना आणि इशा केसकर यांच्या फोटोवरून गॉसिप सुरू असतानाच आता सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या व्हॅलेंटाईनबरोबर शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

सिद्धार्थने आपला व्हॅलेंटाईन डे एका खास व्यक्तीबरोबर सेलिब्रेट केला आहे. या सेलिब्रेशनचा फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमधील सिद्धार्थबरोबरची व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून ती अभिनेत्री मिताली मयेकर आहे!

याआधी सिद्धार्थने मितालीबरोबर एक डबस्मॅश व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत सिद्धार्थ मितालीला 'मी काही तुझा भाऊ नाही, मला भाऊ म्हणू नकोस', असं म्हणतं होता. त्याचबरोबर या दोघांच्या मनगटावरील सेम टॅटूमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या.

काही दिवसांपूर्वी रसिका सुनील आणि सिद्धार्थच्या अफेअरचीही चर्चा रंगली होती. रसिकाने सोशल मीडियावर अनेक वेळा सिद्धार्थ आणि तिचे फोटो शेअर केले होते.


हेही वाचा

सिद्धार्थ चांदेकर पुन्हा पडला प्रेमात! शनायाशी झालं ब्रेकअप?

पुढील बातमी
इतर बातम्या