'माझ्या नवऱ्याची बायकोनं' गाठला ४००चा पल्ला

दरवेळी नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या या मालिकेला छोट्या पडद्यावर येऊन एक वर्ष पूर्ण झालं असून मालिकेनं नुकताच ४०० भागांचा टप्पाही गाठला आहे.   या निमित्ताने या मालिकेच्या कलाकारांनी एकत्र येऊन जोरदार सेलिब्रेशन केलं. मालिकेच्या सेटवरवरच या कलाकारांनी केक कापून वर्षपूर्ती साजरी केली.

कलाकार पार्टी मूडमध्ये

सेलिब्रेशनसाठी मालिकेत अगदी छोटी भूमिका निभावणाऱ्यांपासून ते प्रमुख भूमिकेतील कलाकारांपर्यंत प्रत्येक जण उपस्थित होता.

यावेळी प्रत्येक कलाकार मस्तीच्या मूडमध्ये दिसला. शनाया आणि राधिका यांच्यात ऑनस्क्रिन जरी छत्तीसचा आकडा असला तरी. ऑफस्क्रीन मात्र या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. यावेळी मालिकेचं पोस्टर असलेला खास केक तयार करण्यात आला होता.   

टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर

सध्या 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मलिका यशाच्या शिखरावर असून टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनं दुसरं स्थान पटकावलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या