एका नव्या 'क्रांती'च्या दिशेने!

मुंबई - लॅक्मे फॅशन वीक समर रिसॉर्ट 2017 मध्ये 'क्रांती संस्थे'च्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रेड लाइट परिसरात राहणाऱ्या मुलींनी रॅम्प वॉक केला. या कार्यक्रमाला शबाना आजमी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी या वेळी 'क्रांती' संस्थेचे भरभरुन कौतुक केले. अशा महिलांना क्रांती संस्थेने मदत केली आहे. त्यामुळे मी क्रांतीच्या कामावर खूष असल्याची प्रतिक्रीया शबाना आजमी यांनी दिली.

या फॅशन वीकमध्ये भारतातील कपड्यांमध्ये नावाजलेले 'शेड्स ऑफ इंडिया' या ब्रँडचं सादरीकरण करण्यात आलं. या वेळी 'शेड्स ऑफ इंडिया' चे मालक मंदीप नेगी आणि 'क्रांती' संस्थेचे संस्थापक रॉबिन चौरसिया यांनी या मुलांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. कथेच्या स्वरुपात या मुलींनी आपल्या व्यथा इथे मांडल्या. या फॅशन वीकच्या माध्यतातून रेडलाइट परिसरात राहणाऱ्या मुलांचा बालपणापासून ते किशोरवयापर्यंतचा प्रवास सादर करण्यात आला.

पुढील बातमी
इतर बातम्या