जॅकी चेन येणार मुंबईत!

  • मंदार जोशी & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

मुंबई - प्रसिद्ध अभिनेता जॅकी चेन पुढील आठवड्यात मुंबईत येणार आहे. 'कुंग फू योगा' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जॅकी मुंबईत येणार आहे. येत्या 3 फेब्रुवारीला हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॅकीसह सोनू सूद, दिशा पटनी, अमायरा दस्तूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारतातल्या इतर शहरांनाही भेटी देऊन जॅकी चित्रपटाची प्रसिद्धी करणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या