अभिनेता सलमान खान हा त्याच्या आगामी सिनेमा टायगर जिंदा है मध्ये वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. एक था टायगरचे सिक्वल म्हणजेच टायगर जिंदा है या सिनेमात सलमान रेम्बोच्या रुपात दिसणार आहे. खरेतर टायगर जिंदा है या सिनेमाचा एक पोस्टर जारी करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये सलमान खानने आपल्या हातात मशीन गन घेतले आहे. सलमानचा हा नवीन लूक रेम्बो या सिनेमाची आठवण करून देतो.
बॉलिवूड लाइफच्या एका रिपोर्टनुसार सलमान खानने या सिनेमात एक अॅक्शन सीन शूट करण्यासाठी एमजी 42 या गनचा वापर केला आहे. याचसोबत सलमानने या सिनेमातील एका अॅक्शन सीनसाठी तीन दिवसात 5000 गोळ्या झाडल्या.
या सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर यांनी केले आहे. सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ ही देखील मुख्य भूमिकेत असून तिनेही मशिनगन चालवण्यासाठी तितकीच मेहनत घेतली आहे. हा सिनेमा 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.