गणरायाच्या चरणी ‘शान’दार गीत अर्पण!

गणपती बाप्पाचं आगमन होण्यासाठी आता अवघे काही तासच उरले आहेत. सगळीकडे बाप्पासाठी जोरदार तयारी सुरु आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गायक शानने एक गाणं सादर केलं आहे. ‘माझा बाप्पा श्री’ या गाण्याचा सोलो अल्बम शान रसिकांसाठी घेऊन आला आहे.

गणपतीचं गाणं म्हटलं, की ते जोशपूर्ण असायलाच हवं! म्हणूनच गिरगावातील गिरगाव ध्वज पथक, गजर, कलेश्वरनाथ, जगदंब, राजमुद्रा, स्वस्तिक अशा सहा लोकप्रिय ढोल-ताशा पथकाने या गीताला साथ दिली आहे.

हे गाणं करण्यामागे कारण ही तसंच आहे! शान यांना स्वत:चे यु ट्युब चॅनल काढण्याची इच्छा होती. चॅनल लाँच करताना त्याची सुरुवात गाण्यांनी व्हावी, असं त्यांना वाटत होतं. चांगल्या कामाची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजनाने करतात. त्यामुळेच युट्युब चॅनलचा ‘श्रीगणेशा’ बाप्पाच्या गीतानेच व्हावा या कल्पनेतून हे गीत साकार झालं.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या