'नगरसेवक एक नायक' चा म्युझिक सोहळा

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

मुंबई - सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. पालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. मात्र आता या निवडणुकीचे वारे मराठी सिनेमामध्येही पाहायला मिळणार आहेत. राजकारण आणि समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. याच धर्तीवर ‘जश पिक्चर्स’ प्रस्तूत आगामी ‘नगरसेवक एक नायक’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा मुंबईतल्या स्टॅलिऑन बँक्वेट मध्ये पार पडला. या चित्रपटातील गीतांच्या ध्वनीफितीचे प्रकाशन सुप्रसिद्ध संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या