'मी मराठी' नाबाद 1000

  • संचिता ठोसर & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

प्रभादेवी - लोककलेतून महाराष्ट्राचं दर्शन घडवणारा कार्यक्रम म्हणजे ‘मी मराठी’. नंदेश उमप यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाने आजवर लोकप्रियतेची शिखरं गाठली. रसिकांची पसंती मिळालेल्या या कार्यक्रमाचा हजारावा प्रयोग रविवारी रविंद्र नाट्यमंदिरात झाला. 

7 मार्च 2007 ला मी मराठीचा पहिला प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये रंगला आणि गेल्या 10 वर्षांच्या प्रवासाने आज हजाराचा टप्पा पार केला. मूळ रूंढींपासून दूरावत चालेल्या लोकसंस्कृती आणि लोककलेचा वारसा रसिकांपर्यंत पोहचवण्याचं काम गेली 10 वर्षे हा कार्यक्रम करत आहे.  वारकरी सांप्रदाय, लावणी, भारूड, शेतकरी, पोवाडे असे अनेक लोककलाप्रकार या कार्यक्रमात सादर केले जातात. रसिकांना भूरळ घालणाऱ्या या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री समीरा गुजर आणि आषिश नेवाळकर यांनी केलं. तर, नृत्यदिग्दर्शन विश्वास नाटेकर यांनी केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या