नेटफ्लिक्सवरील 'Squid Game' का ठरतोय लोकप्रियं?

"लक्ष द्या, सर्व खेळाडू, पहिला गेम सुरू होणार आहे," ही सूचना आहे जी लाउडस्पीकरवरून सर्व ४५६ खेळाडूंना दिली जाते, आणि खरी सुरुवात होते नेटफ्लिक्सच्या 'स्क्विड गेम' या प्राणघातक खेळाची...

'स्क्विड गेम' या शोला अलीकडेच प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. जगभरात या शोला प्रचंड पसंती मिळत आहे.  इतका लोकप्रिय की प्रेक्षक शो बघण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत किंवा ज्यांनी पाहिला आहे ते पुन्हा पुन्हा शो बघण्यापासून स्वत:ला थांबवू शखत नाहीत.

शोची कथा ही कोरीयन आहे. शोची कथा, कलाकार, सिनेमॅटोग्राफी, संवाद सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पण हे विचार करण्यासारखं आहे की, यामध्ये असं काय आहे जे लोकांना आकर्षित करत आहे?

ही एक डिस्टोपियन कथा आहे जिथं ४५६ कर्जबाजारी लोक या खेळात सहभागी होतात. हा खेळ जिंकणाऱ्यांना ४५.६ अब्ज रुपये मिळणार असतात. यासाठी ६ खेळांचे ६ वेगवेगळे टप्पे असतात. बहुतांश खेळ बालपणी खेळलेले असतात.

गेमचा पहिला टप्पा सुरू होताच स्पर्धकांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण या गेममुळे सर्वांचा जीव धोक्यात टांगणीला लागल्याचं त्यांना कळतं. दिलेल्या वेळेत गेम पूर्ण करू शकत नसल्यास किंवा सूचनांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास स्पर्धकांना जीव गमवावा लागणार असतो.

पहिल्या भागात 'रेड लाइट, ग्रीन लाईट' मध्ये सहभागी स्पर्धक नियम मोडतात आणि त्यांना गोळ्या घालून ठार केलं जातं. तेव्हा स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांनाही तितकाच झटका बसतो. इथूनच पुढे सुरू होतो जीवघेणा खेळ. हाच तो टर्निंग पॉईंट जिथून प्रत्येकजण शोमध्ये गुंतला जातो. पुढे काय होणार? याच आतुरतेनं प्रेक्षक वाट पाहत असतात.

खेळाचे टप्पे जस जसे पुढे जातात तशी प्रेक्षकांची उत्सुक्ता शिगेला पोहोचते. पुढे कुठला खेळ असेल आणि त्यात होईल हे सांगण हे फारच कठिण होतं.

शोबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की, शोमध्ये मुखवटा घातलेले आणि लाल कपडे परीधान केलेले लोकं दाखवली आहेत. ते कोण आहेत? ते इतके क्रुर कसे वागू शकतात? या खेळामागे नेमकं काय आहे? हा खेळ कोणी आयोजित केला आहे? त्यांचा हेतू काय असतो? याचा उलगडा सर्वांसाठीच धक्कादायक आहे.

एवढंच नाही तर ४५६ स्पर्धकांची खेळात येण्यासाठी असलेली कारण देखील यात दाखवली आहेत. खेळ जिंकण्यासाठी त्यांच्यात लपलेला स्वार्थीपणा, लोभवृत्ती देखील पाहायला मिळते. फक्त एक खेळाडू सोडला तर बाकिचे पैसे मिळवण्यासाठी आणि स्वत:चा जीव वाचवण्यासाठी राक्षस होतात. एकप्रकारे माणसांच्या वेगवेगळ्या वृत्तीचं दर्शन या शोमध्ये होतं.

खरं सांगायचं तर खेळाचे खरे विजेते तर अभिनेते आणि कथा आहे, जी लोकांना शेवटपर्यंत बांधून ठेवते. हा शो एक अशी गोष्ट आहे ज्याची कल्पना कोणीही केली नसेल आणि यापूर्वी असं काही पाहिलं नसेल.

कलाकारांनी अभूतपूर्व काम केलं आहे. एकिकडे तुम्ही त्यांचा तिरस्कार कराल तर दुसरीकडे अभिनय आणि त्यांची दयनीय अवस्था तुम्हाला त्यांच्यावर प्रेम करण्यास भाग पाडेल. हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याचे हे देखील एक कारण आहे.

शेवटी एक खेळाडू जिंकतो. तो कसा जिंकतो? गेमसोबतच तो प्रेक्षकांची मने जिंकण्यास कसा यशस्वी होतो? एवढे पैसे जिंकल्यावर तो काय करतो? सर्वात महत्त्वाचं गेमच्या मागचा खरा सुत्रधार कोण? आणि खऱ्या सुत्रधाराचा उलगडा झाल्यावर एकमेव जिवंत असलेल्या खेळाच्या विजेत्यासोबतच (मुख्य कलाकार) प्रेक्षकांना देखील जबरदस्त धक्का बसतो. आणि इथेच शोचा पूर्ण गेमच पालटतो...

याच सर्व कारणास्तव हा शो इतका प्रचंड हिट ठरत आहे आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरच आहे. त्यामुळे ज्यांनी हा शो अद्याप बघितला नाही त्यांनी हा शो नक्की पाहावा.

सो वाचकांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही गेम मध्ये टिकी शकाल का?


पुढील बातमी
इतर बातम्या